– कार्यकारी अभियंता ह.ग.लवंगारे
सिंधुदुर्गनगरी
अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला आहे. सन 2021-22 च्या हंगामात धरणाचे उर्वरीत काम करण्याकरिता साठा करण्यात आलेले पाणी सिंचन विमोचकाद्वारे नदी पात्रात उद्या 3 डिसेंबर सकाळी 8 वाजल्यापासून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या गावातील ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी नदी पात्रात उतरू नये, सावधानता बाळगावी असे आवाहन मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपालचे कार्यकारी अभियंता ह.ग.लवंगारे यांनी केले आहे.