कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे आढळले दोन रुग्ण
मुंबई
केंद्र सरकारने आणि राज्यांनी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटला रोखण्याचे जिकिरीचे प्रयत्न करूनही ओमायक्रॉन भारतात दाखल झाला आहे.
भारतात पहिल्यांदाच कर्नाटकमध्येही ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आलेत. 66 आणि 46 वर्षाच्या दोन व्यक्तींना ओमिक्रॉनचा संसर्ग झालाय. संसर्ग रोखण्यासाठीही अनेक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिलीय. कर्नाटकमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. तशी माहिती आरोग्य विभागाचे सचिव लव अगरवाल यांनी दिली आहे.
ओमिक्रॉनचे आतापर्यंत 52 म्युटेशन झाल्याची माहिती मिळतेय. अवघ्या काही दिवसात 29 देशात 373 रुग्ण ओमिक्रॉनबाधित आहेत. अमेरिकेत ओमिक्रॉन रुग्ण आढळल्यानंतर बायडेन यांनी लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिलेत. तसेच बूस्टर डोसही देण्यात येतोय.
29 देशात 373 रुग्ण ओमिक्रॉनबाधित
दक्षिण आफ्रिका – 183
घाना – 33
ब्रिटन – 32
बोत्सवाना – 19
नेदरलँड – 16
पोर्तुगाल – 13
जर्मनी – 9
ऑस्ट्रेलिया – 8
हाँगकाँग – 7
भारत – 2