You are currently viewing कोरोना आपत्कालीन सेवेसाठी मालवण शहर प्रभाग आठ मधील तरुणांची टीम सज्ज…

कोरोना आपत्कालीन सेवेसाठी मालवण शहर प्रभाग आठ मधील तरुणांची टीम सज्ज…

मालवण
कोरोना काळात कोरोना रुग्णाची सेवा करण्याच्या उद्देशाने तैयार है हम असे सांगत मालवण शहरात आपत्कालीन सेवेसाठी मालवण शहर प्रभाग आठ मधील तरुणांची टीम सज्ज झाली आहे. कोरोना काळात संसर्गाच्या भीतीपोटी माणुसकी कुठेतरी हरवत चालल्याच्या अनेक घटना आज आढळून येत असून अशा वेळी रुग्णांना सेवा-सहकार्य मिळवून देण्यास पुढाकार घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यू पश्चात अंत्यसंस्कारा बाबतही अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना काळात सर्व प्रकारची आपत्कालीन सेवा मोफत देण्यासाठी मालवण शहरातील तरुणांनी पुढाकार घेतला आहे.
मालवण शहर प्रभाग आठ मधील तरुणांची टीम कोरोना आपत्कालीन सेवेसाठी सज्ज झाली आहे. मालवण शहरात सेवा बजावण्यासाठी आपण तत्पर असल्याचे लेखी पत्र युवकांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना दिले आहे. तरुणांच्या या टीमसाठी शिवसेना नगरसेविका सेजल परब यांनी पुढाकार घेतला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमण काळात पोलीस, आरोग्य या प्रमुख यंत्रणेतील कर्मचारी बाधित होत आहेत. आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. अश्या स्थितीत शहरातील कोरोना आपत स्थितीत काम करण्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनी पुढाकार घेत पालिकेच्या ‘आपत्कालीन कोरोना योद्धा टीम’ मध्ये सहभागी व्हावे. सर्व सुरक्षा सुविधा पालिकेच्या वतीने दिल्या जातील. असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत तरुणांनी घेतलेल्या पुढाकारा बाबत नगराध्यक्ष यांनी तरुणांचे आभार व्यक्त केले आहेत. कोरोना सेवा काळात या तरुणांना पीपीई किट व अन्य सुरक्षा सुविधा पालिका प्रशासनाच्या वतीने दिल्या जातील. असे नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले. यावेळी बांधकाम सभापती यतीन खोत, नगरसेवक मंदार केणी, नगरसेवक पंकज सादये, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, संमेश परब, तपस्वी मयेकर, दत्तात्रय नेरकर व अन्य उपस्थित होते.
दरम्यान, कोरोना सेवा काळात तैयार है हम. असे सांगत मालवण शहरात आपत्कालीन सेवा बजावण्यासाठी टीम सज्ज झाली आहे. यात अन्वय प्रभू (मोबा. ७८२०८२२३८८), संमेश परब, उमेश हडीकर, भाई जाधव, प्रवीण बांदकर, दिवाकर जोशी, तपस्वी मयेकर, नगरसेवक पंकज सादये यांचा सहभाग आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा