जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना
साहित्यात स्पर्धा घेणे हे कधी कधी चूक वाटते
भाग घेणाऱ्या लेखकांना प्रसिद्धीची भूक असते ?
माझे लेखन जिंकून गेले तुझे मात्र नाकारले गेले
माझ प्रेम जास्त कां तुझ हेच जणु विचारले गेले
परीक्षकांचे अवघडच कांही तरी ठरवायचे असते
कुणाला जिंकवायचे तर कुणाला हरवायचे असते
शब्दांच्या या बाजारात जिंकेल त्याला मोल असते
हरणाऱ्याची स्फूर्ती ,मात्र सारि कशी फोल असतें ?
कागदावरचं सन्मानपत्रच अनेकांना तें प्रूफ वाटतं
रसिकांकडून सहज शिट्टी याचं मला अप्रूप वाटतं
जाहिरातींचा खेळ सारा जमेल त्याला जमून जातो
शब्दांचे ओझे वहात कोणी बिचारा दमून जातो
बरे झाले सरस्वतीचा दरबार तेंव्हा खराचं म्हणायचा
परीक्षकाविण गीता गाथा काल तसा बराच म्हणायचा
अखंड स्पर्धा , प्रचंड गर्दी ,उदंड जाहली सम्मेलने
टिकून राहिल्या अभन्ग ओव्या म्हणून जुने तें सोने
अरविंद