भसेनेचे दिग्गज नेतेही होते सोबत
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत शिवसेनेच्या नेत्यांचे संबंध कमालीचे सुधारलेले दिसून येत असून आपापसात देखील सौजन्यपूर्ण नाते बनल्याचे दिसून येते. निमित्त होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा आणि राष्ट्रवादीची धुरा वाहणाऱ्या सौ.अर्चना घारे – परब यांच्या वाढदिवसाचे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सौ अर्चना घारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांना पुष्पगुच्छ देत अभिष्टचिंतन केलं. यावेळी त्यांच्या सोबत माजी पालकमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, कुडाळचे आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, व्हिक्टर डान्टस, काका कुडाळकर, संदीप घारे आदी उपस्थित होते.
येत्या काही दिवसात होणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी ह्या महत्वाच्या मानल्या जात आहेत.