जागतिक एड्स दिनानिमित्त जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य रामदास अण्णा यांची रचना
नवरा-बायको आहे तरी, लफडं केलं बाहेर।
हौस झाली खरी पण, विकत घेतला आहेर।।
वासनेच्या आहारी, दोघे सुद्धा गेले।
म्हणणार लोक की, एड्स ना मेले।।
जिकडे तिकडे दिसतो, विकारांचा बाजार।
नकळतपणे होतो, भयंकर आजार।
किती संभोग केल्याने, मन तुझे भरणार।
हलकटा एक दिवस, उघड्यावर मरणार।।
लागण होईल विषाणूंची, हातात काही नसणार।
टांगलेला फोटो तुझा, भिंतीवर दिसणार।।
स्वतः च्या हाताने, कापू नको गळा।
भागत जर नाही ना, नियम तरी पाळा।।
एड्स रोग बरा नाही, विचार करा अजून।
क्षणभर सुखासाठी, जाऊ नका माजून।।
एकपत्नी प्रियसी, हाच नियम पाळा।
संसाराचा तुमच्या, जळून जाईल मळा।।
रामदास आण्णा
छान कविता