दोडामार्ग
माझे कुटुंब-माझी जबाबदारी या अभियानातर्गत कसई-दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रात वाँर्ड क्र.४ मध्ये माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहुन जनतेशी आरोग्याबाबत संवाद साधला.
शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शहर कोरोनामुक्त व्हावे यासाठी अनेक उपाययोजना सातत्याने करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून श्री नानचे या अभियानात सहभागी झाले. अन् शहरातील जनतेशी आरोग्याबाबत संवाद साधला. यावेळी मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, आरोग्य व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.