मनसेने वेधले जिल्ह्यातील “जुगार” समस्येवर पोलिस अधिक्षकांचे लक्ष
कुडाळ
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मटका व जुगाराचे पेव फोफावत असून त्यात ऑनलाइन जुगार खेळ माध्यमे देखील सक्रिय झाली आहेत.ती वेळीच बंद झाली नाहीत तर त्याचा भावी पिढीवर प्रचंड परिणाम दिसुन येत असून जिल्हात कर्जबाजारीपणा व नैराश्य यामुळे नव तरुणांच्या आत्महत्यांमध्ये अधिक वाढ दिसेल यासाठी जुगार माध्यमांवर वेळीच कारवाई करा अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस उप अधिक्षकांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी ऑनलाइन जुगार व तत्संबंधित पैशाच आम्हीच दाखवणारे खेळावर बंदी आणल्याचा दाखला यावेळी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकरांनी दिला.
यातून आर्थिक लूट करतात . ऑनलाईन जुगाराचे पेव सिंधुदुर्गात देखील आले असून काही मंडळींनी ऑनलाइन जुगाराचे स्वतःचे अँप तयार करून अल्पवयीन मुले, वृद्ध , महिला – पुरुष यांना जुगाराला आकर्षित करून आर्थिक लूट करत आहेत.काही मुलांनी इतरांकडून कर्जाऊ पैसे घेत या ऑनलाईन जुगारात हरून कर्जबाजारी झाले आहेत अशा तक्रारी पालकांकडून मनसेकडे प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यात या ऑनलाइन जुगार प्रकारात दिवसाकाठी सुमारे पस्तीस ते चाळीस लाख रुपयांचा खेळ खेळला जात असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.ऑनलाईन पद्धतीने मिनिटामिनिटाला चालणारे 25 ते 30 पद्धतीचे जुगारी खेळ बंद करण्यासाठी याचे प्रमुख डीलर किंवा वितरक कोण आहेत याची योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
जत्रोत्सव व इतर ग्रामीण भागात चालणारे पट,मटका यावर देखील पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन बंद करावेत.गोव्यातून येणारी चोरटी दारू वाहतूक काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच होत असून ती पुणे,चिपळूण अशी महाराष्ट्रभर पोहचविले जाते.यामुळे राज्याचा महसूल बुडीत जात आर्थिक नुकसान देखील होत आहे.
दोडामार्ग,सावंतवाडी व माणगाव खोऱ्यात केरळीयन लोक केळी व अननस बागेच्या आडून गांजा लागवड करीत आहेत अशा घटना देखील समोर आलेल्या आहेत. त्यामुळे या सर्व बाबींवर आळा घालुन अल्पवयीन मुले व तरुण पिढीला बरबाद होण्यापासून वाचवावे अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,कणकवली दत्ता बिडवाडकर,राजेश टंगसाळी,वैभव धुरी,संतोष कुडाळकर,चंदू चाळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.