You are currently viewing श्याम सावंत यांची राष्ट्रीय काँग्रेस सेवादल दोडामार्ग तालुकाध्यक्षपदी निवड

श्याम सावंत यांची राष्ट्रीय काँग्रेस सेवादल दोडामार्ग तालुकाध्यक्षपदी निवड

राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रसेवा दल दोडामार्ग तालुकाध्यक्षपदी श्याम सावंत यांची निवड करण्यात आली. राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर तसेच जिल्हा सरचिटणीस बाळा धाऊसकर यांनी श्री सावंत यांना सेवादल तालुकाध्यक्ष निवडीचे पत्र दिले. हेदुस येथे श्रीकृष्ण तळवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

केंद्रातील मोदी सरकारला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. राष्ट्रीय काँग्रेस देशाचे नेतृत्व करू शकते हे आता जनतेला पटू लागले आहे. राष्ट्रसेवा दलाचे कार्य पुन्हा एकदा हवेसे वाटू लागले आहे, असे तळवडेकर म्हणाले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक उमेदवारांच्या मागे आपली भक्कम ताकद उभी करेल असेही ते म्हणाले. तर कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक, ग्रामपंचायत पोटनिवडणूका, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्ष नक्की बाजी मारेल असे स्पष्ट करत राष्ट्र सेवा दलाचे नूतन तालुकाध्यक्ष श्याम सावंत यांची निवड पक्षाला उभारी देणारी ठरेल असे श्री धाऊसकर यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रसेवादलाचे युवा जिल्हाध्यक्ष श्री लुडबे, दोडामार्ग तालुका काँग्रेसमधील पदाधिकारी सुधीर चांदेलकर, सुमंत मणेरीकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा