जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या जेष्ठ लेखिका कवयित्री डॉ.निलांबरी गानू यांची काव्यरचना
साठवणींच्या त्या क्षणांना
भेटले रे आज मी
आठवणींच्या पावसात
चिंब ओला थेंबा मी
गुलाबी त्या गारव्याने
फुलांच्या रे ओंजळीत
नवथर स्वप्न होते
बिलगले एकांतात
त्या सुखाच्या मारव्याने
छेडलेला सूर मी
आशिकी चा ज्वर होता
आसक्तीचा पूर् त्यात
संस्कारांनी दिली शक्ती
अस्तित्वाचे मर्म ज्यात
शाश्वत प्रेमरूपी
प्रार्थनेचा स्वर मी
आठवणींच्या पावसात
चिंब ओला थेंब मी
डॉ. निलांबरी गानू