रेडी / वेंगुर्ला :
दीर्घकालीन उपचाराची गरज असलेल्या तसेच नातेवाईक देखभाल करू शकत नसलेल्या रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची आता चिंता मिटली आहे. यासाठी “रेडकर रिसर्च सेंटर” आणि “रमाबाई नारायण प्रभुझाटये ट्रस्ट पणजी” यांच्या माध्यमातून रेडी येथे “विसावा” या उपक्रमांतर्गत चांगली सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वास्तूचा उद्घाटन सोहळा उद्या २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे. तसेच गरजू पर्यंत या सेवेची माहिती पोहोचवावी असे आवाहन रेडकर हॉस्पिटलचे विश्वस्त रविकिरण तोरसकर यांनी केले आहे.
या ठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांना चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच त्या ठिकाणी असलेल्या तज्ञ लोकांच्या माध्यमातून त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळे आता आपल्याला नातेवाईकांची काळजी करण्याची गरज नाही. त्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर हे प्रश्न मिटणार आहे, असा दावाही तोरसकर यांनी केला आहे.