बांदा
‘संविधानाचा सन्मान ,हाच आमचा अभिमान’, ‘स्वातंत्र्य, न्याय ,समता, बंधुता संविधानाने दूर केली बिषमता’ अशा प्रकारच्या घोषणा देत बांदा नं .१केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून भारतीय संविधान सन्मान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या संविधान सन्मान दिनी विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर,केंद्रप्रमुख संदीप गवस आदि मान्यवर होते.
यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व संविधान ग्रथांचे पूजन करण्यात आले व २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूर जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी संविधाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध रांगोळ्या संविधानासंबधी चित्र व लेखन केले होते .यावेळी बोलताना विस्तार अधिकारी साळगावकर मॅडम यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना शालेय वयातच संविधानातील मूलतत्वाविषयी जाणीवजागृती व्हावी या उद्देश्यांनी उपक्रमाचे आयोजन केले असून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे असे सांगितले. या दिवशी विविध पोस्टर हातात घेऊन विद्यार्थ्यांनी बांदा बाजारपेठेतून काढलेली रॅली लक्षवेधी ठरली.या रॅलीत शाळेतील धीरज पटेल,नील बांदेकर व प्रणव डावखुरे या विद्यार्थ्यांनी केलेली बाबासाहेबांची केलेली वेशभूषा आकर्षण ठरली. या दिवशी विद्यार्थ्यांनी बांदा ग्रामपंचातीला भेट देऊन मुलाखतीतून विविध योजनांची माहिती घेतली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सरोज नाईक यांनी केले सूत्रसंचालन उपशिक्षक जे.डी.पाटील तर आभार उपशिक्षक रंगनाथ परब यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये, रसिका मिलवणकर,रूईजा गोल्सवीस ,शुभेच्छा सावंत ,वंदना शितोळे,जागृती धुरी,प्राजक्ता पाटील ,शितल गवस यांनी परिश्रम घेतले.