You are currently viewing आरोस तिठा येथे डॉ. कविता जाधव यांच्या दवाखान्याचे थाटात उद्घघाटन

आरोस तिठा येथे डॉ. कविता जाधव यांच्या दवाखान्याचे थाटात उद्घघाटन

हृदय रोग तज्ञ डॉक्टर अभिजित चितारी यांनी केले फित कापून व श्रीफळ वाढवून उद्घाटन

सावंतवाडी

सावंतवाडी नगर परिषदेचे माजी पाणीपुरवठा आरोग्य सभापती व माजी नगरसेवक विलास जाधव यांची मुलगी डॉ कवीता जाधव हिच्या आरोस तिठ्यावरील दवाखान्याचे उद्घाटन आज सावंतवाडीतील हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर अभिजित चितारी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, सीताराम गावडे, अभय पंडित, संभाजी माळकर, मधुसूदन गावडे, चंद्रकांत गावडे, भालचंद्र गोसावी ,प्रकाश माळकर, भरत धाऊकर ,नरेंद्र मुळीक, डॉक्टर संध्या, विश्वनाथ नाईक,श्वेता नाईक,गौरव जाधव, आदी उपस्थित होते.

यावेळी दवाखान्याच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, त्यानंतर सावंतवाडीतील हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित चितारी यांनी डॉक्टर कविता जाधव यांच्या वाटचालीस शुभेच्छा देताना आरोस पंचक्रोशीतील गरजू रुग्णांना या वैद्यकीय सेवेचा लाभ निश्चित होईल व चांगली सेवा डॉक्टर जाधव यांच्याकडून घडेल असा विश्वास व्यक्त केला.

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी डॉक्टर कविता जाधव यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना भाई साहेब सावंत,आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी ज्यांच्या प्रेरणेतून स्थापन झाले ते आरोग्यमंत्री कै भाईसाहेब सावंत यांच्यामुळे आज जिल्ह्यातील स्थानिक मुले डॉक्टर होऊन बाहेर पडत आहेत,गांधीजींच्या तत्त्वांनुसार खेड्याकडे चला व खेडे विकसित करा त्याच पध्दतीने खेडी विकसीत होत आसल्याचे पाहून आनंद झाला,हरी वारंग यांच्या सारखा समाज सुधारक व्यक्तीने आपल्या गावात सगळ्या सोयी उपलब्ध केल्या आहेत ,त्यामुळे त्यांनाही मी धन्यवाद देतो असे गौरवोद्गार काढले ,व डॉक्टर कविता जाधव या निश्चितच या भागात चांगली सेवा देतील असा विश्वास व्यक्त केला.

या प्रशस्त जागेचे मालक हरी वारंग यांनी आपल्या पंचक्रोशीचा विकास हवा यासाठी या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग केले आहेत, त्यात कृषी केंद्र ,हार्डवेअर चे दुकान, जिम, किराणा मालाचे दुकान,व आता आरोग्यसुविधा ,आपल्या पंचक्रोशीत उपलब्ध केल्या आहेत, त्यामुळे त्यांचेही आभार व्यक्त केले.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, डॉक्टर अभिजीत चितारी,यांनी वारंग यांच्या जिमची पाहणी करून शुभेच्छा दिल्यात.विलास जाधव यांच्या डॉक्टर मुलीला शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा