You are currently viewing दीपस्तंभ

दीपस्तंभ

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री चंद्रशेखर धर्माधिकारी यांची काव्यरचना

मानवतेच्या मंदीरातला,सेवक होऊनी रहा
माणसा हसतमुख तू रहा

ताणतणावाची ही दुनिया
दैन्य,दुःख अन् मोह नि माया
अशा दुनियेचा कलाकार तू
हसता हसवित रहा ।।१।।

नैराश्याचे येतील जरी क्षण
जातील दिसता आशेचा किरण
जीवनाच्या मार्गावरचा दीपस्तंभ तू रहा ।।२।।

सत्कर्माच्या पुण्य भुमीवर
आत्मबुध्दी ही व्हावी स्थावर
ज्ञानाच्या या प्रकाशाची ज्योत म्हणूनी तू रहा ।।३।।

या देहाचे माणूस नाव
माणुसकीचे वसू दे गाव
अशा गावच्या विकासाची पायरी होऊन रहा ।।४।।

मानव जन्म हा फेडाया ऋण
होऊनी नराचा श्रीनारायण
आत्मा हा परमेश्वर जाणून अंतरंग तू पहा ।।५।।

चंद्रशेखर धर्माधिकारी
वारजे, पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा