जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमरानी यांचा लेख
ज्या ज्या वेळी हिंगणगावात प्रवेश करण्याचा योग यायचा अगोदर हा वाडा मात्र डोळ्यापुढे तरळायचा भव्य मंडप नटूनथटून उभ असलेलं लालरंगीत झालरी लक्ष वेदून घ्यायचे नाहीत का कोणास ठावूक हा वाडा मात्र माझा कोणीतरी असल्यासारखा वाटायचा क्षणभर बेचैन होऊन मी याच वाड्यापुढे रेंगाळायचो.सुकलेल्या गवतास वाचा फुटायची मला पहाताच वा-यात झोक्यात मान हलवून ख्यालीखुशाली खुशाली विचाराचे.मग मी कळतनकळत मंद हसत थोडीशी मान झुकवत मनोमन नमन करायचो.पांढरी माती उगीत धडपडायची एखादा बारकासा दगड वरुन उडी मारून यायचा दोन्ही पायाच्या जवळच पडायचा तो छोटासा दगड हातात घेऊन कुरवाळायचो.मग मला गौतम बुद्धाची आठवण व्हायचे दगड थेरिपीचा अनुभव घ्यायचो. दगडाला बराच वेळ कुरवाळत किंचित डोळे बंद करुन त्याचे कडेकोपरे मनात गच्च भरायचो.अन् बंद डोळ्यानी तो दगड हळूच खाली टाकायचो मग कोणाचीही पर्वा न करता मी मातीत पडलेला तो दगड शोधायचो बरीच छोटी छोटी दगड स्पर्श करता करता तो दगड माझ्या हाती लागायचा किती आनंद व्हायचा.मला व त्या छोट्याशा दगडाला.हातात झेलत मी एकदोन उड्या मारून आनंद व्यक्त करायचो त्या क्षणी तो दगड हसायचा. उड्या मारायचा. मग मी तो दगड घरी घेऊन जाण्यासाठी खिशात टाकायचो. मी तीन वेळा या वाड्यास भेटलो तीन्हीवेळा मी हेच केले .आता तीन खडे एकमेकांशी बोलत असतील असा भास होतो.थोडीसा तिरपा झालेला वासा आपल्या खांद्यावर भार सोसत उभा आहे. दार बंद अाहेत पण त्यावरची नक्षी आजच कारागिरांनी कोरल्यासारखी ताजी आहे.तसा मी कधीच या वास्तूत राहिलो नाही.तरीही काहीतरी नाते असावे असे वाटते. जुनी झालेली कडी उगीच वा-याच्या झुळकी सरसो वाजत राहते.वाटते .धाब्यावर उगवलेले गवत हिरवे आहे.असत डोकावून पाहिले की,पडवीत उंबर,पिंपळ,एरंडी,रानगवत,जोमाने आले आहे .तरीही एका कोप-यात जाते. त्याच्या शेजारी उखळ स्पष्ट दिसते. आताच कोणीतरी जात्यावर ओव्या म्हणत दळण दळत असल्याचा भास होतो.अन् जात्यावरच्या ओव्या ऐकू येतात पहिली माझी ओवी ग,जात्यावर गाईली, कखगघ अक्षरे पाटीवरी काढली.:
*मुबारक उमराणी*