सिंधुदुर्गनगरी :
सावंतवाडी शहरात भटवाडी येथील वार्ड सी, जिल्हा परिषद कॉलनी रुम नं.4 रोड पासून 20 मीटर अंतरावरील इमारतीचा 25 चौ.मी. परिसर दिनांक 30 सप्टेंबर 2020 पर्यंत, सालईवाडा येथील घर नं. एफ 302 ब, पुरता पूर्व बाजूस सुमारे 5 मीटर, पश्चिम बाजूस सुमारे 30 मीटर, उत्तर बाजूस 10 मीटर, दक्षिण बाजूस 4 मीटरचा परिसर, दिनांक 3 ऑक्टोबर 2020 पर्यंत, माठेवाडा येथील घर नं. बी 120/ ई आजूबाजूचे क्षेत्र, पूर्व बाजूस सुमारे 5मीटर मोकळी जागा, पश्चिम बाजूस 5मीटर मोकळी जागा, उत्तर बाजूस 2 मीटर मोकळी जागा, दक्षिण बाजूस 5 मीटर मोकळी जागा, व चोहबाजूचा अंदाजे क्षेत्र 42 चौ.मी. चा परिसर,जुनाबाजार येथील वार्ड-ए दिप दर्शन अपार्टमेंट रुम नं. 19 बी विंग चा अंदाजे क्षेत्र 15 चौ.मी. चा परिसर दिनांक 3 ऑक्टोबर 2020 पर्यंत, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये संबंधित दिनाकांपर्यत रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.