You are currently viewing स्वच्छ सर्वेक्षण २०२०-२१ मध्ये अभि मुसळेंनी बजावलेल्या अनमोल कामगिरीची घेतली दखल

स्वच्छ सर्वेक्षण २०२०-२१ मध्ये अभि मुसळेंनी बजावलेल्या अनमोल कामगिरीची घेतली दखल

नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या हस्ते सत्कार..

कणकवली :

कणकवली नगरपंचायतच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२०- २१ मध्ये आपल्या आरोग्य सभापती पदाच्या काळात अहोरात्र मेहनत घेत देशात कणकवली नगरपंचायतची मान उंचावणाऱ्या माजी आरोग्य सभापती अभि मुसळे यांचा नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सभापतीपदाच्या काळात आमदार नितेश राणे यांना अभिप्रेत असणारे काम केल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया यावेळी मुसळे यांनी व्यक्त केली.

नगराध्यक्ष दालनात झालेल्या या सत्कारप्रसंगी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, विद्यमान आरोग्य सभापती संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण आदी उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षण २०२०-२१ अभियानात कणकवली नगरपंचायतने पश्चिम झोन मधील गुजरात, गोवा, महाराष्ट्र या ३ राज्यांमधून कणकवली नगरपंचायत ने ६७ वा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या धवल यशाबद्दल माजी आरोग्य सभापती अभि मुसळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा