कणकवली
सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठक मंगळवार 23 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12 ते 04 वाजता
कणकवली प्रहार भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे व मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीला सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सर्व मोर्चा/आघाडी जिल्हाअध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मंडल अध्यक्ष, सरचिटणीस यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.