You are currently viewing अनंत सरवणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

अनंत सरवणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

‘मानवता हाच खरा धर्म.!’ – एस.पी.परब

वैभववाडी

उंबर्डे गावचे सुपुत्र कै. अनंत सरवणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘धर्म म्हणजे काय? आज प्रबोधनाची गरज’ या विषयावर विद्यार्थी गट, शिक्षक गट व खुला गट अशा तिन विभागात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख रक्कम स्वरूपात पारितोषिक वितरण समारंभ आज उंबर्डे माध्यमिक विद्यालयात संपन्न झाला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे, गट क्र.१- विद्यार्थी : प्रथम – प्रणाली सुरेश पांचाळ, द्वितीय – श्रद्धा सतिश पाटकर, तृतीय – प्रचिती चंद्रकांत दळवी. गट क्र. २ – शिक्षक : प्रथम – मंदार सदाशिव चोरगे (अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी), द्वितीय – कलावती मारुती सुतार (आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी), तृतीय – संजय कानिराम राठोड (माध्यमिक विद्यालय उंबर्डे). गट क्र. ३ – खुला : प्रथम – प्रज्ञा व्यंकटेश डुबळे, द्वितीय – सोनाली सुरेश पांचाळ, तृतीय – प्रियांका प्रकाश वाडेकर.

विजेत्या स्पर्धकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील साधारण ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. निवृत्त मुख्याध्यापक एस. पी. परब, केंद्रप्रमुख विजय केळकर, उपक्रमशील शिक्षक आर. के. बोबडे, अस्लम पाटणकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक शैलेंद्रकुमार परब, कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ दळवी (उंबर्डे हायस्कूल संचालक), माजी मुख्याध्यापक व सरपंच श्री. बोबडे, मुख्याध्यापक नादकर बी. एस., अध्यापक संघाचे अध्यक्ष शिंदे एस. बी., सरवणकर कुटुंबातील सदस्य व मुंबईचे माजी पोलीस निरीक्षक संदिप सरवणकर, वैशाली सरवणकर तसेच उंबर्डे उपसरपंच दशरथ दळवी, चंद्रकांत दळवी, हुसेन लांजेकर, संदेश तुळसकर, रज्जत रमदुल, धर्मरक्षीत जाधव, उंबर्डे हायस्कूल मुख्याध्यापक श्री. राठोड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदि मान्यवर व पारितोषिक विजेते स्पर्धक, प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उंबर्डे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एस. पी. परब सर यांनी ‘मानवता हाच खरा धर्म आहे.!’ असे मत आपल्या मनोगतात व्यक्त केले. मान्यवरांबरोबरच विजेत्या स्पर्धकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा