सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणचे पंढरपूर म्हणून सोनुर्ली माऊली जत्रा ओळखली जाते.ही जत्रा लोटागणासाठी प्रसिध्द आहे.या देवीला लोटागणाचा नवस बोलला जातो.पुरुष झोपुन मंदिराभोवती प्रदक्षीणा घालतात तर महिला उभ्याने प्रदक्षीणा घालतात.या जत्रेला संपूर्ण महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक मधुन लाखो भावीक येतात.यावर्षी अवकाळी पाऊस,एस.टी.च्या संपाचा मोठा फटका या जत्रौत्सवाला बसला.पाववसामुळे मंदिरपरिसरामध्ये चीखलाचे साम्राज्य पसरले होते.लोटागणासाठी प्लॅस्टिक घालण्यात आले होते.भावीक रेनकोट घालुन छत्री घेवुन फीरताना दिसत होते.याचा मोठा फटका व्यापार्याना बसला.कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे हा जत्रौत्सव झाला नव्हता.यावर्षी एस.टी.चा संप आणि अवकाळी पावसाने भाविकांमध्ये नाराजी दिसत होती.