जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी दीपक पटेकर यांची सावंतवाडी शहर म्हणजे पूर्वीचे सुंदरवाडी ची महती, वैशिष्ट्य सांगणारी काव्यरचना
काय आणि किती सांगू
महती माझ्या गावाची
नाव असे सावंतवाडी
सर्वांमुखी चर्चा नावाची
राजघराण्याचा वारसा
उभा राजवाडा दिमाखात
किर्तीवंत होते राजर्षी
अशी नोंद इतिहासात
मोती तलाव शान वाडीची
बारा महिने भरलेला
ओसंडून वाहे पावसात
काठी आनंदतो थकलेला
आत्मेश्वर तळी वाहे
जमिनीवर पाच फूट
त्रिशूळ मारता धरणीने
पाणी वाहण्या दिली सूट
उपरलकर देव सीमेवर
रक्षण करतो वाडीचे
निसर्गसौंदर्य अवर्णनीय
उभ्या नरेंद्र डोंगराचे
लाकडी खेळणी प्रसिद्ध
धडे शाळेच्या पुस्तकात
स्वच्छतेचे पुरस्कार होते
सुंदरवाडीच्या शिरपेचात
शांत सुंदर समृद्ध शहर
नावलौकिक महाराष्ट्रात
सण उत्सव वारसा कलेचा
सारे जन तो जोपासतात
©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग, ८४४६७४३१९६
१६ नोव्हेंबर २१