खा. विनायक राऊत, ना.उदय सामंत, आ.वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात तोडलेल्या झाडांच्या बदल्यात शासनाने सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून १ किमी परिसरात वृक्ष लागवड करण्याची योजना अंमलात आणली. त्याअंतर्गत सिंधुदुर्गातील १७० शेतकऱ्यांनी खाजगी क्षेत्रात ५२६३१ वृक्ष लागवडीची कामे केली असून त्यासाठीचे १ कोटी ५१ लाख २६ हजार ८८५ रु. चे रोपवनपूर्व प्रथम वर्ष अनुदान सामाजिक वनीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत.
सन २०१९ मध्ये या झाडांची लागवड करण्यात आली होती. परंतु त्याचे अनुदान अद्याप पर्यंत मिळाले नव्हते. यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वारंवार पाठपुरावा सूरु होता. त्यांच्या पाठपुरवठ्याला यश आले असून शेतकऱ्यांनी लावलेल्या वृक्ष लागवडीचे अनुदान सामाजिक वनीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत.
कणकवली ते झाराप पर्यंत १७० शेतकऱ्यांनी शासनाच्या योजने अंतर्गत १ कि मी पर्यंतच्या आपल्या खाजगी क्षेत्रात ५२६३१ वृक्षांची लागवड केली होती. त्यासाठी प्रथम वर्षासाठी १ कोटी ५१ लाख २६ हजार ८८५ रु. अनुदान देणे अनिवार्य होते. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत हे अनुदान सामाजिक वनीकरण विभागात वर्ग झाले नव्हते. त्यामुळे सदर लाभार्थी शेतकरी लोकप्रतिनिधींकडे हे अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी मागणी करत होते. यामुळे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठपुरावा करून लाभार्थी शेतकऱ्यांचे १ कोटी ५१ लाख २६ हजार ८८५ रु.अनुदान मंजूर करून घेतले असून सदर अनुदान सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडे वर्ग झाले आहेत. लवकरच या अनुदानाचे लाभार्थी शेतकऱ्यांना वाटप होईल अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली आहे.