कोण किती वेळा पडले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे नंतर कंटाळून मागच्या दाराने मंत्री झाले तेही माहीत आहे, विशाल परब हे स्वयंघोषित नेते असल्याची टीका युवा सेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी केली.
तुम्ही शिवसेना,मुख्यमंत्री, शिवसेनेचे आमदार खासदार यावर बोलत असता त्यामुळे नाविलाजास्तव त्यांना पण बोलावं लागत त्यासाठीच तुम्हाला भाजप ने घेतलंय,
मोदी लाटेवर निवडून येऊ शकतो अस वाटत असेल तर माजी खासदारांनी खासदरकीला आणि माजी मुख्यमंत्री यांनी आमदारकीला उभे रहावे म्हणजे कळेल.
शिवसेना एक कुटुंब आहे इथे छोटा मोठा काही नाही शिवसैनिक हा मोठा आहे….तुम्हाला उपसरपंच छोटा वाटतं असेल आम्हाला प्रत्येक माणूस महत्वाचा वाटतो.त्याच छोट्या प्रवेशसाठी काही माणसं पैसे घेऊन गेलेली पण सगळीच माणस पैश्याने विकत घेता येत नाही हे घावनळ्यामधील जनतेने दाखवून दिलं.
मोदी लाटेवर तुम्ही वाडोस ग्रामपंचायत मध्ये निवडून या त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असेही ते म्हणाले.
आमची गटबाजी पेक्षा तुमचं बघा,जे कांग्रेस मध्ये केलात तेच भाजपमध्ये सर्व महत्वाची पदे राणे समर्थकांकडे जुने भाजप कार्यकर्ते मात्र उपेक्षितच राहिले त्यांना सवतीची वागणूक मिळत आहे,पण त्या जुन्या भाजप कार्यकर्त्यांचा आम्ही नेहमी आदर करू,
विशाल परब यांच्या आव्हानाला युवासेना देखील चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा त्यांनी दिला.