वैभववाडी–
उंबर्डे ग्रामपंचायतीच्या दणक्याने उंबर्डे फोंडा रस्त्याचे नूतनीकरण कामाला सुरुवात करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच उंबर्डे फोंडा रस्त्याचे नूतनीकरण कामाचे भूमिपूजन मी आमदार नितेशजी राणे यांनी केले होते परंतु राजकारण करून काम दिरंगाई करण्याचे ठेकेदारांचे ठरल्याची कुणकुण उंबर्डे सरपंचांना लागताच त्यांनी पीडब्ल्यूडी ला आंदोलनाची नोटीस दिली होती त्यामुळे प्रत्यक्ष कार्यकारी अभियंता सौ छाया नाईक यांनी उंबर्डे येथे येऊन रस्त्याची पाहणी करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे परंतु जोपर्यंत डांबराचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलनाची नोटीस मागे घेणार नाही असा इशारा सरपंचांनी दिला आहे. ठेकेदार श्री दिगंबर पाटील यांनी सरपंच बोबडे यांच्याशी चर्चा करून आपण आंदोलन करू नका आम्ही रस्त्याचे काम सुरू करतो असे ठोस आश्वासन दिल्याने दिल्याने सरपंच यांनी यांनी काम सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे परंतु तोपर्यंत डांबराचे काम या आठ दिवसात सुरू न झाल्यास आमचेआंदोलनाची नोटिसा मी मागे घेणार नाही असा इशारा सरपंच उपसरपंच उंबर्डे कोळपे तिथवली यांनी दिला आहे