गरड भागात दिंडे कोरले तुळशीचा रंग बाकीच
रणशिंग सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक
“उतावळा नवरा गुढग्याला बाशिंग” अशीच काहीशी परिस्थिती…..
हिच ती वेळ
असे म्हणत गरड तिठ्यावर सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बॅनर लावून ज्या दीपक केसरकर यांच्या आशीर्वादाने दोन वेळा नगरसेवक पद भोगले त्यांनाच प्रति आव्हान देत गरड येथील दीपक केसरकर? की बबन साळगावकर यांचा कट्टर समजल्या जाणाऱ्या एका माजी नगरसेवकाने भाजपाच्या संजू परब यांना मूठ घट्ट झाल्यावर खुलेआम मदत केली.गरड भागातील 60 ते 70% जनता सोबत आहे म्हणणाऱ्या या माजी नगरसेवकाला दीपक केसरकर यांच्याकडे उमेदवारी मागण्याचीही गरजच नाही, 70% जनमत सोबत असणारा अपक्षही निवडून येऊ शकतो परंतु गरड भागातील लोक या माजी नगरसेवकाला कंटाळले असल्यानेच सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, आणि प्रभागात तर लोकांना आपल्यालाच उमेदवारी देणार अशा बढाया मारत आहे. केसरकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी दिलेला खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या विरोधात बंड करत संजू परब यांची तळी उचलताना यांना लाज वाटली नव्हती का?
बबन साळगावकर यांना इच्छा असल्यास आपल्या सोबत येण्यास खुले आमंत्रण देताच, गेली 5 वर्षे आपण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणविणारा हा माजी नगरसेवक आता पुन्हा शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी का धडपड करतो आहे? जर तो दीपक केसरकर हे वलय बाजूला ठेऊन स्वतःच्या जीवावर निवडून येऊ शकतो, गरड विभागात स्वतःची ताकद आहे तर शिवसेनेच्या आणि दीपक केसरकर यांच्या कुबड्यांसाठी का फिरतो आहे?
मी बांधीन ते तोरण आणि मी सांगेन ते धोरण ही प्रवृत्ती शिवसेना संघटनेत चालत नाही. त्यामुळे तोरण बांधण्याच्या आधी गरड नाक्यावर हीच ती वेळ हा बॅनर बांधला होता याची आठवण मात्र नक्की ठेवावी.
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणवणाऱ्या या माजी नगरसेवकाला राष्ट्रवादीने काडीची देखील किंमत दिली नाही. संधीसाधू आणि दुसऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीस राष्ट्रवादी पक्षांमध्ये जागा नाही हेच सावंतवाडी राष्ट्रवादीने दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीने अगोदरच एका कार्यकर्त्याला या प्रभागात पद देऊन ठेवले असल्याने या माजी नगरसेवकाची गोची झाली आहे. राष्ट्रवादी जवळ करत नाही, अपक्ष राहून किंमत नाही, मग नाक मुठीत धरत जाणार तर कोणाकडे?
आहेत ना दीपक भाई
मागील सावंतवाडी नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत काहीजणाकडून हात गरम झाल्यावर आपली मते विरोधी उमेदवाराला मिळवून दिली म्हणणाऱ्या माजी नगरसेवकाला खरी माहिती आहे का?
खेमराज कुडतरकर या शिवसेनेच्या उमेदवाराला प्रभागातून 290 मते मिळाली होती आणि संजू परब यांना 310 मते मिळाली. म्हणजे उगाच हवेने फुगणाऱ्या या व्यक्तीचा संजू परब यांच्या मताधिक्क्यामध्ये वाटा तो किती?
गेले काही दिवस दीपक केसरकर यांनी किंवा शिवसेना पक्षातील इतर कोणीही जबाबदार पदाधिकारी अथवा नेत्याने गरड येथून उमेदवारी देण्याबाबत कुठलेही आश्वासन दिलेले नसताना प्रभागातील घरा घरामध्ये जाऊन शिवसेना पक्षाशी, भाईंशी बोलणी झालेली आहेत, आपल्यालाच उमेदवारी भेटणार अशा बढाया मारणाऱ्या माजी नगरसेवकाला बंडखोरीचे बक्षीस म्हणून कोणताही पक्ष उमेदवारी देणार का ? हाच मोठा प्रश्न आहे ?
मागील निवडणूक आणि पोटनिवडणूक, दोन्ही वेळेस विरोधी उमेदवारांना मदत करून ज्या पक्षाकडून नगरसेवक म्हणून कारकीर्द घडवून मालमत्ता जमा केली त्याच पक्षाच्या विरोधात जाऊन गेली पाच वर्षे असंतुष्ट म्हणून शहरात फिरत आहे. नाक्यानाक्यावर लोकांच्या गाठीभेटी घेत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात जागा मिळविण्यापेक्षा गमावण्याचीच संधी चालून आली आहे. कपटनीती आणि बंडखोरी ही लोकांच्या नजरेत भरल्याने भविष्यात प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
★★★★★★★★★
कशात नाय काय आणि फटक्यात पाय अशी परिस्थिती असणाऱ्या, दोन वेळा शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना पाडण्याचे पाप करणाऱ्या, गरड नाक्यावर खुलेआम हीच ती वेळ असा बॅनर लावून शिवसेनेला आव्हान देणाऱ्या आणि “आपल्याला विश्वासात न घेतल्याने आपण विरोधी पक्षाला मदत केल्याची जाहीर कबुली देणाऱ्या माजी नगरसेवकाला आमदार साहेब पक्ष उमेदवारी देणार का?”
हाच प्रश्न गरड विभागातील सुजाण नागरिकांना पडला आहे …