आवळेगाव येथील श्री देव नारायण मंदिरात वार्षिक जत्रोत्सव 15 नोव्हेंबरलाआवळेगाव येथील श्री देव नारायण मंदिरात कार्तिक महिन्यातील भागवत एकादशी दिवशी सोमवार दि. 15 नोव्हेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावलौकिक असलेला पहिला वार्षिक जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
14 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता देव रवळनाथ मंदीर ते नारायण मंदिर पालखी सोहळा, 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता गावची ओटी भरून ओटी भरणे कार्यक्रम सुरू, सकाळी 11 वाजता देव दत्त मंदिर ते नारायण मंदिर पायी दिंडी, रात्री 11 वाजता पालखी सोहळा, रात्री 12 वाजता खानोलकर दशावतारी नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता नारायण मंदिर येथे तुळशी विवाह कार्यक्रम आदी कार्यक्रम होणार आहेत. यावेळी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन मानकरी व आवळेगाव ग्रामस्थांनी केले आहे.