You are currently viewing मी कांही म्हटले नाही

मी कांही म्हटले नाही

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलाकार श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना

कुणि कांही म्हणा, कुणि कांही म्हणा
मी कांही म्हटले नाही
अन् संसारी राहून कशाला
नाही म्हटले नाही

मज आठवते ती सांज, तसा एकांत,अजुन ही आज
कोवळ्या मुखी तव सहज पणाने पांघरलेली लाज

नि: शब्द जरी मी,अधिर पणाने विचारले तू कांही
मी कांही म्हटले नाही मि नाही म्हटले नाहि

नकळत झालो एक,कधी चालून पाउले सात
आयुष्य उभे चालण्या बरोबर हाती घेवुन हात
कधि रागाने, कधि लाडाने तू मागितले मज कांहि
मी कांही म्हटले नाही मी नाही म्हटले नाही

चाहुल लागता स्वर्ग सुखाच्या मातृत्वाची तुजशी
सॆर भॆर होउन उगिच मी बसलो तुझ्या उशाशी
क्षण येता जवळी गहिंवरुन तू वदलिस राहि जवळी
मी कांही म्हटले नाही मी नाही म्हटले नाही

आनंदी तव पाझर नयनी सॊख्याचा दरबार
ती गोड गोजिरी सान पाउले हेच तुझे घरदार
मज समीप येण्या वेळ कुठे? बघ बाळ झोपला नाहि
मी कांही म्हटले नाहि मि नाही म्हटले नाही

संसारी गुंतलो सुखातच उणे न उरले कांही
जवळ तरी तू दूर कधि कां कोडे सुटले नाही
तिन्हिसांज भिवविते आतां सल उरात राहेतरिही
मी कांही म्हटले नाही मी नाही म्हटले नाही

न्याहळीत तुज आयुष्य जगलो हीच साधना साधि
बोललिस कधि गंहिवरून मज द्या निरोप तुमच्या आधि
मग एकदाच अन् अखेरचे मी म्हटले नाहि नाही
मी म्हटले मुळिच नाहि मि म्हटले मुळिच नाही
कुणि कांहि म्हणा, कुणि कांही म्हणा मी कांही म्हटले नाही
पण एकदाच संसारी होउन म्हटले त्रिवार नाही

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा