सावंतवाडी
मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयकॉन कलारत्न पुरस्कार सिंधुदुर्गचे सुपुत्र तथा दशावतारातील लोकप्रिय हार्मोनियम वादक मयुर गवळी याना जाहिर झाला आहे. मयूर गवळी यांना यावर्षी प्राप्त झालेला हा पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.
मयुर गवळी या युवा हार्मोनियम वादकाने आपल्या सुरेल आवाजातुन दशावतार लोककलेच्या माध्यमातून ‘भाव अंतरीचे हळवे’ हे लंगार गीत सातासमुदरापलीकडे पोहोचवीले. या कलेच्या माध्यमातून त्यांनी संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असुन विविध क्षेत्रातील संस्थानी त्याच्या या कलेचा गौरव केलेला आहे.
मयूर गवळी यांच्या अल्पावधीतील या कलेची दखल घेऊनच त्यांची या राज्यस्तरीय युथ आयकॉन कला रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या २९ डिसेंबरला मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषदेत पद्मश्री विजय कुमार शाह आणि मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक अँड कृष्णाजी जगदाळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मयुर गवळी यांची राज्यस्तरीय कला रत्न पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरांतुन अभिनंदन होत आहे.