सावंतवाडी
निवडणूक जवळ येत असून त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अर्थासंकल्पासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांना उत्तरदेखील देता आले नाही. त्यामुळे सावंतवाडी नगरपरिषद चुकीच्या लोकांच्या हातात गेली असल्याचे सिद्ध झाले असून त्यांच्या कोणत्याही टिकेला उत्तर देण्याएवढा मी लहान नाही आणि माझा वेळही वाया घालवणार नाही, अशी टीका आमदार दीपक केसरकर यांनी आज येथील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.