जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरुणजीपुराणिक यांची काव्यरचना
रंगीबेरंगी फुलपाखरू
आयुष्य त्याचे छोटे ।
समाधान मानून त्यातच
भिरभिर फिरते कोठे ।।१।।
फुलपाखरासम आपणही
आयुष्य जगावे छान ।
स्वछंद,मुक्त फिरताना
देते आनंदाचे दान ।।२।।
हसत खेळत जगावे
शोध घेता सुखाचा ।
विनोदाची झालर लावून
मिळतो आनंद फुकाचा ।।३।।
संकट आले जरी
सामर्थ्ये त्याला पेलावे ।
दुःखामागून सुख येते
क्षण त्यातील वेचावे ।।४।।
आयुष्यात जे जे केले भले
पुण्य संचयी गाठी मिळते ।
आयुष्याच्या सारीपटावर
मोल त्याचे अमूल्य असते ।।५।।
हसता हसता एक दिवस
या जगाचा निरोप घ्यावा ।
आठवणी मागे ठेवुनी
ठसा आपला खोल उमटावा।।६।।
*अरुण पुराणिक* ©️ ®️
*निगडी प्राधिकरण , पुणे ४११०४४*….
*९७६६५४९६२०*….