You are currently viewing भात खरेदी १४ नोव्हेंबर पासून  सुरू करण्याचे ना. उदय सामंत यांचे आदेश

भात खरेदी १४ नोव्हेंबर पासून सुरू करण्याचे ना. उदय सामंत यांचे आदेश

*आमदार वैभव नाईक यांची माहिती*

 

सिधुदुर्ग जिल्हयातील शासकीय भात खरेदी बाबतची आढावा बैठक आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री ना. उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे ,सिंधुदुर्ग जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. १४ नोव्हेंबर २०२१ पासून प्रत्यक्ष भात खरेदी सुरु करण्याचे आदेश पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी बैठकीत दिले असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

जिल्ह्यात भात खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली असून लवकर भात खरेदी सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यावेळी कणकवली तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष विठ्ठल देसाई, एम.के.गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिवृद्ध देसाई, यांसह संबंधित शासकीय अधिकारी, जिल्ह्यातील खरेदी विक्री संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा