नेमळे गावचे सुपुत्र रांगोळी कलाकार समिर चांदरकर यांनी युथ फोरम देवगड आयोजित रांगोळी स्पर्धेत व्यक्तीचित्र विषयावर साकारलेल्या या रांगोळीला प्रथम क्रमांकाचा मान देण्यात आला. कोकणात भात सराईची कामे जोरदार सुरू आहेत. भल्या पहाटे घरातली सर्व कामं आटपून जेव्हा आपली आई शेतात काम करायला जाते. कोणतीही तक्रार न करता घरातल्या मंडळींना, गुराढोरांना हवं नको ते बघते तरीही चेहऱ्यावर नेहमी हास्य असते. अशाच कोकणातील एका आईचे व्यक्तिचित्र रांगोळीतून साकारण्याचा समिर चांदरकर यांनी प्रयत्न केलेला आहे. सतत या रांगोळीकडे एकटक नजरेने पाहत बसाव अस मनापासुन वाटत. ही रांगोळी नसुन ही एक आई आहे ही एक जिवंत मुर्तीच आहे.
काहींना ही रांगोळी आहे हे पटणारही नाही.