सिंधुदुर्गनगरी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे सोमवार, दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
सोमवार दिनांक 08 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 1.05 वा. एअर इंडिया विमानाने सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी ता. वेंगुर्ला येथे आगमन व मोटारीने कणकवली, जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. आगमन व कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात बैठक (स्थळ- नगरपरिषद, कणकवली). दुपारी 3.30 वा. कणकवली येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. जिल्हा नियोजन अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीच्या नियोजनाबाबत आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 4.30 वा पासून 1) कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा बैठक 2) शासकीय योजनेअंतर्गत भात खरेदी करणेसंदर्भात संयुक्त बैठक 3) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बलुतेदार संस्थांच्या अडी-अडचणीसंदर्भात बैठक.4) कुर्ली-घोडसरी-देवधर मध्यम प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक. (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). सायं. 5.45 वा. पत्रकार परिषद (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). साय. 6.15 वा. ओरोस येथून मोटारीने कुडाळ जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. सायं. 6.30 वा. कुडाळ तालुका शिवसेना मेळावा.(स्थळ- घावनाळे, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग). रात्रौ सोईनुसार घावनाळे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण.