लेख: अहमद मुंडे
मनापासून आणि पूर्ण विचार करूनच दिला जाणारा शब्द म्हणजे आश्वासन. हे आपणा सर्वांना माहीत आहे. आश्वासन देत बसणेची सुरवात होते ती आपल्या घरापासून नव्हे तर लहानपणापासून तु शाळेत जा तुला हे देतो ? अशी आश्वासने दिली जातात आणि त्याप्रमाणे आपण वागतो आपले काम करतो. काॅलेज महाविद्यालय विद्यालय उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा वर्ग यामध्ये आपण शिकत असताना शिक्षकांनी १००/ टक्के निकालांचे आश्वासन. मुला मुलींनी एकामेकाला दिलेली आश्वासने. मग ती प्रेमाची असो वा लगनाची असो. असे सर्व आपले आयुष्य आश्वासनावर चालत असते
आपणं पौढ झालो आणि आपल्याला मतांचा अनमोल अधिकार मिळाला. मग. ग्रामपंचायत. नगरपालिका. महानगरपालिका. आमदारकी खासदारकी. बॅंक निवडणूक. काॅलेज महाविद्यालय विद्यालय मध्ये होणारी निवडणूक. सोसायट्या निवडणूक. शिक्षक संघांची निवडणूक. कामगार संघटना निवडणूक. एस टी अध्यक्ष पदासाठी निवडणूक. अशा अनेक माध्यमांतून निवडणूका घेतल्या जातात. आणि कळत नकळत आपल्याला मतदानाचा अधिकार असतो आणि तो कोणत्याही भुलथापांना बळी न पडता बजावयचा असतो.
निवडणूका जाहीर झाल्या की सभा. मिटींगा. मतदान संपर्क. मतदार प्रशनाची चाचपणी. .गावचा शहरांचा विकास अशा विविध प्रशनाची चर्चा सुरू होते #मला निवडून द्या मी गावात पाणी. रस्ते. गटर. स्मशानभूमी. बाग बगिचे. प्राथमिक आरोग्य केंद्र. समाजमंदिर. वृद्धाश्रम. निवारा केंद्र. अशा विविध माध्यमातून गावांचा विकास करेण. दिला जातो तो शब्द नसतो तर असत ते फक्त आश्वासन. वरील प्रमाणे कोणताही विकासाचा फंडा राबविला जात नाही. आणि राबविला तर फक्त आणि फक्त पैसा मिळविणे एवढाच उद्देश असतो. मी हे करिन मी ते करिन म्हणून काय उपयोग प्रत्यक्षात काहीच नाही. निवडणूकी पुरतेच मान खाली घालून पाया पडणारे उमेदवार निवडणून आल्यावर त्या प्रभागात दिसत सुध्दा नाही. याला आपणच कारणीभूत आहोत कारणं मतदानासाठी आपण आपला आत्मसन्मान मटन. दारु. आणि काही पैसे यांवर विकला आहे. आज ५०० पुढच्या वेळी १००० आपण निवडून येणार एवढा आत्मविश्वास उमेदवार यांना आहे. खोटी आश्वासने द्यायची आणि जनतेची दिशाभूल करायची
आमदार खासदार मंत्री पुढारी नेते यांनी आपल्या जिल्ह्यात २००५/२०१९/२०२१ या काळात महापूर आले. लोकांचें शेती. जनावरें गोठे. जनावरें वाहून जाणे. घरांची पडझड. मयत व्यक्ति. जीवनावश्यक वस्तू नुकसान. अशा विविध बिकट परिस्थितीत. शासनाने जनतेची फसवणूक केली. जतेला वाटाव शासन आपल्यासाठी काहीतरी करतय म्हणून सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. ते फक्त कागदावरच राहिले. मोठ मोठे सत्ताधारी विरोधी पक्षनेते यांनी पूर ग्रस्त भागाला भेटी दिल्या. काहीजणांनी आकाशातून तर काहीजणांनी बांधावरून. आणि जनतेला. दिला तो शब्द नव्हता ते होते फक्त आश्वासन. कधीच पूर्ण न होणारें. पूर ग्रस्त भागाला विविध योजना सुरू करण्यात आल्या. सर्वात मोठे दुर्भाग्य आहे ते म्हणजे. २००५ ची पूर ग्रस्त भागांची मदत. दुसरा पूर २०१९ ला आला तरी मिळली नाही. त्यांनंतर २०२१ ला महापूर आला तरी २०१९ ची पूर ग्रस्त भागातील मदत मिळाली नाही. आणि २०२१ ला जो पूर आला त्याची नुकसानभरपाई पंचनामे झाले गावच्या गावं वाहून गेली. पण आज पर्यंत पूराची नुकसानभरपाई मिळविण्यासाठी जनतेला उपोषण आंदोलन करावे लागते म्हणजे सर्वात मोठ दुर्भाग्य म्हणावं लागेल मग आश्वासन गेली कुठ? योजना सुरू करायची आणि त्यात अशी काही कागदपत्राची अट घालायची की गोरगरीब ती पूर्ण करू शकत नाही मग तो नुकसान भरपाई मध्ये येत नाही.
आपल्या विकासाची रक्तवाहिनी मानली जाणारी रस्ते ही संकल्पना ज्यांनी अंमलात आणली त्यांनी विकासाला मोठा हातभार लावला. रस्ते विकास रुंदीकरण. यामुळे विकास वाढला. वाहने वाढली. वाहतूक वाढली त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले. शासन निर्णयानुसार नियमानुसार. करण्यात येणारी वाहतूक आणि त्या वाहनांचे होणारें अपघात यामध्ये मयत व्यक्तिंच्या वारसांना एक विशिष्ट रक्कम शासन नेते पुढारी आमदार खासदार मंत्री जाहीर करण्याचे आश्वासन देतात पण खरोखरच कोणत्याही वारसाला त्याचा फायदा होत नाही. कारण त्यात मयत व्यक्ति आपलाच आहे त्याच्या बरोबर आपले नाते सिध्द करण्यासाठी लागणारी कागदपत्रे तो जोडू शकत नाही त्यामुळे कधीच पूर्ण न होणारें आश्वासन आणि त्यामागे पळणारे आपण खरच खुळ आहोत
निवडणूका आल्या की समाजातील वंचित घटक. बांधकाम कामगार. सफाई कामगार. एस टी कामगार. अशा विविध स्तरांतील कामगारांना दिवाळी बोनस देण्याचे कोणतरी आश्वासन देतो. दिवाळीच्या आगोदर ही एक विशिष्ट रक्कम कामगारांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले जाते. आणि आपण सर्वजण खुळयासारखी त्या बोनस रक्कमेची वाट पाहतो. विचार करा शासकीय निमशासकीय कार्यालयात काम करणारे अधिकारी व कर्मचारी कचेरीत काम. टंकलेखन. कारकून. पर्यवेक्षण. बॅंकिंग व्यवस्थापन. शिक्षण. वैद्यकीय. यासारखे प्रतिष्ठेचे. काम करणारे यांनी आपल्या कामावर रुजू झाल्यापासून बरेच वर्ष आॅफिसला दिलेली असतात त्यांना बोनस मिळण किंवा देण पटत पण असंघटित क्षेत्रातील कामगार यांना बोनस देण सर्वात मोठ पाऊल आहे आणि ते पूर्ण होणारच नाही म्हणून दिला तो शब्द नव्हता ते होते फक्त आश्वासन
भूकंप. नैसर्गिक आपत्ती यामध्ये सर्वांना घर बांधून देण्याचे आश्वासन. त्यांना दत्तक घेण्याचे आश्वासन. विविध शाळा दत्तक घेण्याचे आश्वासन. विविध निवारा केंद्र वृध्दाश्रम यांना सेवा देण्याचे आश्वासन. अपंग विकासासाठी देण्यात आलेले आश्वासन. विविध ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचे कर कमी करण्याचे आश्वासन. विज बिल कमी करतो म्हणून फसव देण्यात आलेलं आश्वासन. महिलांना सुरक्षा बद्दल देण्यात येणार आश्वासन. विविध योजना राबविण्याचे आश्वासन. अशी एक नाही अनेक आश्वासने फसवी दिली जातात. त्यातील कोणतेही आश्वासन पूर्ती केली जात नाही.
उच्च जातीना उत्तम सुविधा चांगल्या संधी आणि प्रतिष्ठेचे व्यवसाय मिळतातं त्यांना करावा लागणारा जीवनसंघरष या व्यवहारिक फायदयामुळे बराचसा सुसह्य होतो
म्हणजे आश्वासनावर विश्वास ठेऊ नका. कारणं आश्वासने ही फसवी असतांत
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९