जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची अहिराणी या खानदेशी बोली भाषेतील काव्यरचना
रोज याद येस माले माहेरनं गनगोत
असंकसं तुटी गये मनं माहेरशी नातं
रोप उपाडीनी लावं दूर वावरमां फेकं
अशा कशा रीती भाती दूर देसले ती लेक…
ठोकी ठोकी नि घडसं जसं कुम्हार मडकं
मनी अहिरानी माय तसा लेकरे घडसं
मना मामाले मामाजी मामीले मामीजी म्हनतस
मना काकूले काकूजी नमीसनी बोलतस…
दाजभाऊ दादाभाऊ नानाजी मोठमाय
घरोघर गायगोठा वासरू बी हंबरंस….
वट्टावर बकऱ्यानी कों..बड्या फिरतीस
मोती कुतरा दारम्हा,बठी राखन करस…
चुल्हावर तपे दुध त्यानी पिवयी ती साय
काला भाकरना मोडे साय टाके मनी माय
घरोघर “भालदेव “दुध तूप नि रेलचेल
ताक घुसये रांजन ताक वाटी दे ये माय ….
भोत भरीसनी ये ये सुटे दारम्हा ते गाडं
कपाशीवर चढूत खुंदी खुंदी नि दमाडं
भोत भरीन जवारी पायत खयाम्हा ती चाले
एक एक गोट आते रोज याद येस माले …
नही माहेरनी सर, तठे सरगं बी फिका
मया कितली करस,लेक, जन हो ते देखा
हाक मारता हंबरे,मायबाप नि करता
जलम निंघी जास तिना माहेर झुरता झुरता ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)