You are currently viewing श्री देवी महालक्ष्मी नारूर वार्षिक जत्रौत्सव १८ नोव्हेंबरला

श्री देवी महालक्ष्मी नारूर वार्षिक जत्रौत्सव १८ नोव्हेंबरला

श्री देवी महालक्षमी चा वार्षिक जत्रौत्सव दिनांक १८.११.२०२१ रोजी मोठ्या भक्ती भावाने संपन्न होत आहे तरी सर्व भाविकांनी जत्रेस उपस्थित राहून श्री देवी महालक्ष्मीचा कृपाआशीर्वाद घ्यावा असे आवाहन चार बारा गावकर मंडळी बहुमानकारी व देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या वतीने श्री.दीपक नारकर यांनी आवाहन केले आहे.
कार्यक्रम
दिनांक-१८.११.२०२१
सकाळी ८.०० वाजता सार्वजनिक गाऱ्हाणे व लघुरुद्र.
दुपारी१.००वाजता महाप्रसाद.
सायंकाळी ७.०० वाजता पुराण व आरती.
रात्री ११.०० वाजता पालखी सोहळा.
रात्री १२.०० वाजता वालावलकर दशावतार यांचा नाट्यप्रयोग.
सकाळी ८.०० वाजले पासून ओट्या भरणे, नवस फेडणे, नवस बोलणे कार्यक्रम चालू.

 

दिनांक-१९.११.२०२१
सकाळी ८.०० वाजता अभिषेक व पूजा.
दुपारी ३.०० वा. कीर्तन, पारंपारिक कार्यक्रम व गोपाळकाला.
सायं. ५.०० वा. उपदैवतांची सवाद्य, पालखी मिरवणुकीसह भेट.
रात्री ९.०० वा. अक्षतारुपी महाप्रसाद.

दिनांक-.२०.११.२०२१
सकाळी ८.०० वा. लघुरुद्र.
दुपारी १.०० वाजता आरती व गाव समाराधनेचा महाप्रसाद.
सायं.४.०० वा. सांगता.
या प्रमाणे ३ दिवस वार्षिक जत्रौत्सवाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्री देवी महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन
चार बारा गावकर मंडळी, बहुमानकरी, व देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नारूर. क.नारूर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा