You are currently viewing सावंतवाडीत जिओने खोदलेल्या चरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक – मेणबत्ती लावून निषेध

सावंतवाडीत जिओने खोदलेल्या चरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक – मेणबत्ती लावून निषेध

सावंतवाडी

जिओ कंपनीने शहरात खोदलेल्या चरांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.त्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली असून हे चर तात्काळ बुजवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी त्यांनी सालईवाडा भागात खड्ड्यात मेणबत्त्या लावून उपोषण केले. तसेच शिरोडा नाका परिसरात असलेले काम रोखत पहिले बाजारपेठेतील रस्ते सुस्थितीत करा, आणि नंतर बाजूच्या परिसरात काम करा, अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली. तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी हिदायतुल्ला खान, इफ्तिकार राजगुरू, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, संतोष जोईल, देवा टेमकर, बावतीस फर्नांडिस, असलम खतीब, दर्शना बाबर-देसाई,नझीर शेख,जहिरा, ख्वाजा आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा