सिंधुदुर्गनगरी :-
सावंतवाडी शहरात भटवाडी येथील सीव-बर्जिसवाडा रोडपासून 50 मीटर अंतरावर नवीन इमारतीचा 30 चौ.मी. परिसर, वैश्यवाडा येथील पनेवेलकर कॉलनी,दुसरा मजला प्लॅट नं. 2 चा अंदाजे क्षेत्र 3 मीटर परिसर, दिनांक 28 सप्टेंबर 2020 पर्यंत परिसर, पांजरवाडा येथील स्वामी समर्थ अपार्टमेंट पहिला मजला रु नं. 6 चा अंदाजे 3 मीटर परिसर, बाहेरचावाडा येथील वार्ड- सी इमारत क्र. 76 आजूबाजूचे क्षेत्र पूर्व बाजूस-08 मीटर, पश्चिम बाजूस-05 मीटर, उत्तर बाजूस-03 मीटर, दक्षिण बाजूस-03 मीटर, दिनांक 29 सप्टेंबर 2020 पर्यंत, खासकीलवाडा येथील वार्ड-ई पोलीस वसाहती मधील रुम.नं. 15 चा परिसर,सबनिसवाडा येथील म्युनिसिपल डी-वार्ड घर क्र. 81 चा चाहुबाजूंचा अंदाजे खुले क्षेत्र 35 चौ.मीटर परिसर, दिनांक 30 सप्टेंबर 2020 पर्यंत, खासकीलवाडा येथील वार्ड-ई 161/सी घराचे क्षेत्र 160 चौ.मीटर चा परिसर दिनांक 4 ऑक्टोबर 2020 पर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये संबंधित दिनांकापर्यंत,सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.