दादर म्हणजे मुंबईतल्या मराठी संस्कृतीचे माहेरघर आणि इथल्या बहुरंगी बहुढंगी मराठमोळ्या संस्कृतीचे हृदय म्हणजे आपले ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही आपले ‘शिवतीर्थ’ विद्युत दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित ‘दीपोत्सवा’चा शुभारंभ सौ. शर्मिलावहिनी ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अमितजी ठाकरे, श्री. नितीन सरदेसाई, माहीम विभाग अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार यांच्यासह लोकप्रिय अभिनेते श्री. अजिंक्य राऊत आणि श्रीम. ऋता दुर्गुले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी पक्षाचे अनेक पदाधिकारी तसंच मोठ्या संख्येने ‘दादरकर’ उपस्थित होते.
‘दीपोत्सव’ शुभारंभाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने शिवतीर्थाचा आसमंतही बराच काळ लखलखत होता. अवघ्या मुंबईचे आकर्षण ठरलेला हा ‘दीपोत्सव’ १९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
या “दीपोत्सव” रोषणाईचा आनंद लुटण्यासाठी ‘झी मराठी’ वाहिनीवरील “चला हवा येऊ द्या” या लोकप्रिय कार्यक्रमातील सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. निलेश साबळे, श्रीम. श्रेया बुगडे, श्री.भारत गणेशपुरे, श्री. सागर कारंडे, श्री. उमेश जगताप, श्रीम. स्नेहल शिदम आणि श्री. तुषार देवल उपस्थित होते. “शिवतीर्थ” परिसरातील रंगीबेरंगी विद्युत रोषणाई बघून हजारो मुंबईकरांप्रमाणेच हे कलावंतही भान हरखून गेले होते. याप्रसंगी पक्षाचे नेते श्री. नितीन सरदेसाई, सरचिटणीस श्री. मनोज चव्हाण, विभाग अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच छोट्या पडद्यावरील मन उडू उडू झालं ही मालिका चाहत्याच्या घरांघरात पोहोचली आहे. या मालिकेतील इंद्रा आणि दिपू म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांची जोडी चाहत्यांना खूपच भावली. या मालिकेतील अजिंक्य राऊत आणि ऋता दुर्गुळेने यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.