कार्यालयावर धडक व निषेध
वेंगुर्ला
तालुक्यातील शिरोडा केरवाडी येथे दीपावली या एन सणाच्या दिवशी MSEB च्या भोंगळ कारभारामुळे लाईट नसल्यामुळे ग्रामस्थांना दिवाळी पहाट अंधारात साजरी करावी लागली. याचा तीव्र संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी एमएससीबी शिरोडा कार्यालयात धडक देत त्यांचा निषेध व्यक्त केला.
शिरोडा केरवाडी, बागायत, खाजनभाटी भागात गणपती पासून लाईट चा खेळ खंडोबा सुरू आहे. काल तर दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असताना सायंकाळी अचानक लाईट गेल्यामुळे सर्वांचा हिरमोड झाला. थोड्या वेळाने लाईट येईल या आशेवर असणाऱ्या ग्रामस्थांना दिवाळी पहाट अंधारात साजरी करावी लागली.
या मुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आज सकाळी ९ वाजता सरपंच मनोज उगवेकर यांच्यासह तातोबा चोपडेकर, पांडुरंग नाईक, आबा चीचकर, काशिनाथ नार्वेकर, आशिष पेडणेकर, मोटे, सोमकांत सावंत, गोपाळ बटा यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ एमएससीबी कार्यालया बाहेर गोळा झाले. यावेळी ग्रामस्थांनी या खात्याचा निषेध नोंदवत जो पर्यंत अधिकारी कार्यालयात येत नाहीत तो पर्यंत आम्ही कार्यालयातून होणार नाही असा पवित्रा घेतला आहे. स्वतः ची नुकसानभरपाई तत्पर पणे करते पण 12 तास लाईट नसल्याने गावातील जे ग्रामस्थांचे, व्ययसायिकांचे नुकसान होते त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न सरपंच श्री. उगवेकर यांनी उपस्थित केला आहे.
शिरोड्या साठी कायमस्वरूपी अधिकारी द्या..
शिरोड्या गावासाठी एमएससीबी कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी द्या. येथे देण्यात येणारे अधिकारी यांच्यावर फक्त गावाच्या कामाचा चार्ज दिला जातो. त्यामुळे त्यांच्याकडे कोणतीही समस्या नेल्यास ते वरिष्ठ पातळीवर विचारुन काम करतो अशी उत्तरे देतात. त्यामुळे या गावातील कार्यालयासाठी कायमस्वरूपी अधिकारी द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तर फक्त वसुलीसाठी तत्परता का – ग्रामस्थांचा प्रश्न
वीज वितरण कंपनी च्या कार्यालयात ग्रामस्थांनी विजेच्या खेळ खंडोबा बाबत काही विचारणा करण्यासाठी गेले असता अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे केवळ एक दोन हजार रुपयांच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आधी वीज पुरवठा सुरळीत सुरळीत करावा आणि नंतर वसुली मोहिमा राबवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.