खाकीचा शिलेदार “धापू वरात” चे लाभले मार्गदर्शन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांची पोलखोल करणाऱ्या संवाद मीडियाने फोंडा येथील अट्टल जुगारी पारावरचा विठ्ठल आणि त्याचे जुगाराच्या बैठकांचे कारनामे, बैठकांच्या वेळा आणि जुगारासाठी जिल्हाभरातून येणारे जुगारी यांचे फोन आपल्या कस्टडीत ठेवत वारंवार जुगाराच्या बैठकांच्या जागा बदलणे आणि या सर्वांसाठी पारावरच्या विठ्ठलाला समर्थन, मार्गदर्शन व पाठराखण करणारा खाकी वर्दीतील झारीतील शुक्राचार्य “धापू वरात” यांचे कारनामे उघड केले होते. संवाद मीडियाच्या बातमीनंतर फोंडयाच्या पारावरचा विठ्ठल सावध झाला असून खाकीचा शिलेदार “धापू वरात” याच्या मार्गदर्शनाखाली बैठकीची वेळ रात्री आठ वाजताची बदलत संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.०० अशी केली.
*खाकितील शिलेदार “धापू वरात” याच्या मार्गदर्शनाखाली* आज सायंकाळी ४.०० वाजता फोंडयाच्या पाण्याच्या टाकीखाली सुरू झालेली जुगाराची बैठक पारावरच्या विठ्ठलाला तब्बल ३.०० लाख रुपये मिळवून देऊन गेली.
संवाद मीडिया प्रत्येकवेळी जिल्ह्यातील जुगार मटका, अवैध दारू तस्करी आदींबाबत आवाज उठवत असतो, परंतु जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जोपर्यंत जिल्ह्यातील भ्रष्ट खाकी वर्दीतील “धापू वरात” सारखे अवैद्य धंद्यांचे रक्षक शोधून त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत, तोपर्यंत जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसणे कठीण आहे. अवैध धंद्यांना सावरणारा भक्कम पाठिंबा देणारा खाकी वर्दीतील शिलेदार भेटला तर पारावरच्या विठ्ठलासारखे जुगारी दिवसाला लाखो रुपये कमवून चैन करतील आणि घरातील बायकांच्या अंगावरील सोनेनाणे विकून, घरदार गहाण टाकून जुगारात आपले नशीब आजमावणारे मात्र भिकेकंगाल होतील.