वर खोटी पोलीस तक्रार करत ग्राहकाला पोलीसांकरवी केली दमदाटी!
महावितरणच्या अभियंत्याचा ओरोसमधला संतापजनक प्रताप उघड झाला असून ग्राहकाने अधीक्षक अभियंत्याकडे त्याची लेखी तक्रार दाखल केली आहे. स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करुन उर्मट वर्तन करणाऱ्या ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील अभियंता श्री तारापुरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ओरोस येथील तक्रारदार ग्राहक श्री एस.एस. सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री विनोद पाटील यांच्याकडे केली आहे. पाटील यांनी तातडीने त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
याबाबतीतले सविस्तर वृत्त असे की तक्रारदार श्री सावंत यांनी मागील १८ महिन्यांपासून ओरोस येथे भाड्याने फ्लॅट घेतला आहे. त्याचे वीज बिल थकीत राहिले होते. पण त्याची वीज जोडणी कोणतीही पूर्वकल्पना न देता महावितरणने खंडित केली होती. त्यानंतर त्यांनी वीजबिल आणि पुनर्जोडणी रक्कमदेखील भरली. त्यानंतर पूर्वसूचना न देता मीटर तोडल्याबद्दल ग्राहकांने नाराजी व्यक्त असता वायरमनने अभियंत्याला फोन करून ग्राहक चिडल्याचे सांगितले. अभियंता तारापुरे सिंघम स्टाईलने तिथे अन्य चार माणसांसोबत आले आणि ग्राहकाला शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानुसार वायरमनला सांगून जोडलेला मीटर पुन्हा काढून आणायला सांगितला. जोडलेला मीटर कोणतेही कारण नसताना केवळ अधिकाऱ्यांच्या मनात आले म्हणून काढून नेला जाऊ शकतो का? मीटर का काढला जातोय त्याचे कारण द्या असे विचारले असता मी भाडेकरूलाच नाही, तर मालकालाही धडा शिकवू शिकवून दाखवतो म्हणत मीटर तर काढलाच, पण सरकारी कामात अडथळा आणण्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ग्राहकाला देऊन दहशत माजवत माजवण्यासाठी ओरोस पोलिस स्थानकात तक्रार देखील दिली होती. ओरोस पोलीसांनीही तक्रारीची शहानिशा न करता एखाद्या गंभीर गुन्ह्यात कारवाई करावी तसे सामान्य वीज ग्राहकासाठी पोलीस व्हॅन सोसायटीच्या दारात लावली.
आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या तारापुरे या अभियंत्यावर कठोर कारवाई तातडीने करण्यात यावी अशी तक्रार श्री सावंत यांनी महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री विनोद पाटील यांच्याकडे केली आहे.