You are currently viewing कलाकारांची दिवाळी कडू

कलाकारांची दिवाळी कडू

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

लेख: अहमद मुंडे

कलेला आकार देणारा कलाकार मातीला आकार देणारा कुंभार शिल्पास आकार देणारा शिल्पकार. लोखंड वितळून त्याला आकार देणारा लोहार मातीला आकार देणारा कुंभार समाजात आपल्या कले द्वारे समाज प्रबोधन संबोधन. करमणूक जनजागृती जाहिरात करणारे एकमेव नाव आहे ते म्हणजे कलाकार असे विविध कलाकार आपण बघतो काही ध्यानात राहतात. आणि काही विसरून काळाच्या पडद्याआड जातात.
बॅण्ड वाले. बॅनजोवाले. तमाशगिर. गोपाळ गोलहा. दांगट. नंदिबैलवाले. मदारी. साप गारुडी. वासुदेव. भविष्य कथन करणारे. मनकवडी. कुडमोडे जोशी. डमरू वाले. भिक्षेकरी. विविध रुप घेणारे सोंगाडे. लोकनाट्य. गोंधळी. बहुरूपी. जागरण. आरकेसटरा. पोपटवाले. डोंबारी. पांगूळ. डवरी. अस्वलाचे खेळ करणारे. भजन कीर्तन द्वारे जनजागृती करणारे. लग्नात विविध कला सादर. करणारे. असे एक नाही अनेक कलाकार आपल्या नशिबाला पुजलेली गरिबी पोटासाठी मिळेल त्या सुपारीवर आपली कला सादर करणारे कलाकार. जवळपास ढोबळ मानाने या अशा कलाकारांचा सर्वे केला तर असे निदर्शनास आले की भारतात ११ कोटी पेक्षा जास्त कलाकार संख्या आहे त्यातील महाराष्ट्रात ७३ लाख संख्या आहे हे सर्व जण पोटासाठी आज हे गाव उद्या ते गाव असा प्रवास असतो. भीक कोण देत नाही. शेती नाही. कायमचा निवारा नाही. शिक्षण नाही. हव तस हाताला काम नाही रोज सकाळी दान पावल म्हणणारा वासुदेव. पाऊसाचे भाकित करणारा नंदीबैल वाला. पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची म्हणणारी ती नृतकी. भविष्य कथन. ठराविक अंतरावर उभे राहून आपली कला सादर करणारे मनकवडी. नाचतो गा डोंबारी म्हणत दोरीवर उड्या मारणारे. दांडपट्टा घोडेस्वारी छातीवर दगड फोडणे असे मैदानी खेळ करणारे. असे विविध कलाकार पोटाच्या आकांताने ओरडत असतो आणि आपण टाळ्या वाजवत असतो स्वता खरोखरच रडणारा कलाकार याचा तो अभिनय आहे म्हणून आपण त्याचा आनंद घेत असतो. सगळ व्यवस्थित चालला होत कलाकार आणि मुल बायका. म्हातारे आई वडील यांना कसेबसे दोन वेळचे जेवण मिळत होत पण जास्त काळ ही प्रस्थिती राहिली नाही.
२२/२३ मार्च ला कोरोना सारखे महाभयंकर महामारी संकट आले आणि शासनाने लोकांच्या संपर्कामुळे गर्दि यामुळे कोरोना सारखी महामारी वाढण्याचा धोका शासनाच्या ध्यानात आला त्यामुळे शासनाने मार्च २०२० मध्ये. वाडी वस्ती गाव तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये टाळेबंदी जारी केली. आणि जगण्यासाठी पैसा मिळविणारा जीव वाचवण्यासाठी घरातच बसून राहीला. शासनाने विविध सामाजिक कार्यक्रम. लग्न. मुंजी. वाढदिवस. जंयती. पुण्यतिथी. असे विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले त्यातच जत्रा. यात्रा. रद्द करण्यात आल्या त्यामुळे. या सर्व कार्यक्रमात वाजाप काम करणारे कलाकार यांच्या हाताला काही कामच राहिलं नाही. कलाकारांच्या हाताला काहीच काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली काही कलाकारांना ही उपासमारीची वेळ बघणे अवघड झाले एकवेळ लोकांच्या सहवासात राहून वाहवाह मिळविलेल्या कलाकाराने आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपली जीवनयात्रा संपवली किती वाईट आहे बघा
कलाकारांच्या विविध अडचणींवर. प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी. सांगली मधून कलाकार महासंघ यांनी ग्रामपंचायती पासून मंत्रालयापर्यंत मार्च २०२० ते २०२१ पर्यंत कलाकारांना काम नाही त्यांचे सर्व कार्यक्रम कोरोनामुळे रद्द झाले यांना शासनाने या टाळेबंदी काळात कोणतीही मदत दिली नाही. यासाठी पत्र व्यवहार करून. जागोजागी बंद आंदोलन मोर्चा रस्ता रोको आंदोलन. बोंब मारो आंदोलन. हायवे आंदोलन. अशी वेगवेगळी आंदोलने १४ महिन्यात करण्यात आली. पण शासनाला या कलाकारांची दया आली नाही. शेवटी मुख्यमंत्री यांनी तिस-या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर ११ आक्टेबर २०२१ रोजी. कार्यक्रमावर लावणेत आलेले निर्बंध हटविण्यात आले आणि कार्यक्रम करण्यास मार्ग मोकळा झाला पण सर्व काही पूर्व नियोजित आणि पहिल्या सारखें होण्यास बराच वेळ लागणार आहे. शासनाने कोरोना काळात कलाकारांचे झालेले नुकसान भरपाई म्हणून एकही रूपया कलाकारांना दिला नाही.
६०/६५ वयोवृद्ध गटातील अ ब क गटानुसार मानधन देणें निर्णय आहे त्यानुसार शासनाने ५६ हजार वयोवृद्ध कलाकारांना २८ कोटींचे पॅकेज जाहीर केले पॅकेज जाहीर करून बरेच दिवस झाले पण खरोखरच कलाकारांना आत्ता दोन महिन्यांचे मानधन अनुदान आत्ता मिळाले म्हणजे जाहीर झाले कधी मिळालं कधी यांचा काही मेळ आहे का ? कोरोना काळातील दोन वर्षांची नुकसान भरपाई. व शासनाकडून देण्यात येणारे अनुदान मानधन वेळेत मिळाले असतें तर आज सर्वांच्या घरांत दिवाळी साजरी होत आहे. प्रत्येक जणांचे तोंड गोड होणार आणि आमचा कलाकार तोंड कडू करून बसला आहे. म्हणजे संस्कृती व आपले संबोधन प्रबोधन प्रचार प्रसार करणारे कलाकार यांच काय ?
टाळेबंदी जारी करण्यात आली तेव्हा कलाकार यांनी हाताला मिळेल ते काम मिळेल त्या मजूरीवर केलें
शासनाकडून निर्णय जाहीर झाला पण त्याची अंमलबजावणी कलाकार जीवंत आहे तोपर्यंत करणे गरजेचे आहे शासनाने विविध क्षेत्रातील लोकांच्या साठी विविध आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली आहेत पण आपल्या तरूणाईच्या काळात कलाकार वयोवृद्ध होत आहेत. त्यावेळी त्यांच्यावर येणारी वेळ अतिशय वाईट आहे शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे पटटिचा कलाकार रस्त्यावर भिक मागताना दिसत आहे. चहा तंबाखू द्या. घरच्यांची मदत नाही. मुल पोसत नाहीत. शासनाच्या शासन त्यांच्या नोकरी प्रमाणेच थोडी का होईना पेन्शन देत असतें म्हणजे ६० वर्षात सेवानिवृत्त झाल्यावर. त्यांचे पुढचे आयुष्य सुखकर व्हावे यासाठी शासनाचा उपक्रम आहे पण कलाकार कशातच नाही. मग कलाकारांना पेन्शन योजना सुरू होणार का ? त्यांची अंमलबजावणी होणार का ? कलाकार जगला पाहिजे नाहीतर गोष्टींच्या रूपात कला व कलाकार आपल्या मुलांना सांगावें लागतील
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा