You are currently viewing वेंगुर्ल्यात भाजपाच्या वतीने “दिव्य दिवाळी उत्सव २०२१”

वेंगुर्ल्यात भाजपाच्या वतीने “दिव्य दिवाळी उत्सव २०२१”

४ ते ९ नोव्हेंबर कालावधी : विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन

वेंगुर्ले

भाजपाच्या वतीने “दीपज्योती नमोस्तुते” वेंगुर्ला दिव्य दिवाळी उत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधी हा उपक्रम घेतला जाणार असून याअंतर्गत स्थानिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली.

लक्ष्मीपूजना दिवशी ४ नोव्हेंबरला वेंगुर्ले येथील रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धा , ७ नोव्हेंबरला वेंगुर्ला कॅम्प येथील त्रिवेणी संगम उद्यान परिसरात दीपोत्सव व दिपावली शोटाईमअंतर्गत अनिता करावके हा गीतगायन , नृत्य फनीगेम्सचा कार्यक्रम , ८ रोजी लोकनृत्य उत्सव तर ९ रोजी दिपसंध्या संगीतरजनीमध्ये सावंतवाडी येथील सद्गुरु संगीत विद्यालयाचा गीतझंकार हा अभंग , भक्तिगीत व सदाबहार चित्रपट गीतांचा कार्यक्रम होणार आहे . इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धा रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धेसाठी प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे २००० , १५०० , १००० व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी ५०० रुपये व प्रशस्तीपत्र असे परितोषिक देण्यात येणार आहे . स्पर्धा वेंगुर्ला तालुका मर्यादित असून स्पर्धकांनी आकाशकंदील बनविताना प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करू नये , अधिक माहिती व स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ९ ४२२४३६७७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

एक पणती प्रकाशाची वेंगुर्ले कॅम्प येथील नव्याने विकसित करण्यात आलेल्या त्रिवेणी संगम उद्यान येथे ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान दीपपूजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता दीपोत्सव होणार आहे. उद्यानाच्या सभोवताली उपस्थितांकडून दीपपूजन करण्यात येणार आहे. ‘ एक पणती प्रकाशाची ” या उपक्रमात सहभागी होत प्रत्येकाने ज्ञान, उन्नती व प्रकाशाचा दीप प्रज्वलीत करावा, असे आवाहन वेंगुर्ला भाजपतर्फे करण्यात आले आहे. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता दिपावली शोटाईमअंतर्गत अनिता करावके यांचा गीतगायन , फनीगेम्स, मिमिक्री आणि धम्माल मस्तीचा कार्यक्रम होणार आहे. ८ नोव्हेंबरला सायंकाळी स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकनृत्य, समईनृत्य व पारंपरिक नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील नामवंत संघाची बहारदार नृत्ये सादर होणार आहेत. स्थानिकांनी सहभाग घेण्यासाठी भाजपच्या वेंगुर्ला कार्यालयात संपर्क साधावा. तर ९ नोव्हेंबर रोजी गीतझंकार संगीत रजनी कार्यक्रमाने वेंगुर्ला दिव्य दिवाळी उत्सवाचा समारोप सावंतवाडी येथील सद्गुरु संगीत विद्यालयाच्या गीतझंकार या संगीतरजनीने होणार आहे. भक्तिीगीत, भावगीत व नाट्यगीतांची अप्रतिम मेजवानी यानिमित्ताने वेंगुर्लावासीयांना मिळणार आहे. या संपूर्ण महोत्सवाचा वेंगुर्लेतील नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा