देवगड
सुक्ष्म,लघु,मध्यम उद्योग मंत्रालय नवी दिल्ली राष्ट्रीय मत्स्य विकास बोर्ड हैदराबाद मार्फत पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांच्या प्रयत्नातून देवगड येथे उद्योजक विकास कार्यक्रम अनुसुचित जातीच्या लोकांसाठी जलचर व मत्स्य विभाग विषयावर 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दहा दिवसांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्या मंत्रालयात विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या स्त्री-पुरुष बेरोजगार लोकांसाठी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांनी आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये समुद्री संपत्ती पासून अनेक प्रकारचे व्यवसाय उद्योग करण्याची संधी प्राप्त करता येईल.
आपल्या कल्पक बुद्धीने या मंत्रालयाकडून मिळणारे प्रशिक्षण घेऊन त्या सर्टिफिकेट व ज्ञानाच्या आधारावर आपण आपला व्यवसाय निर्माण करू शकाल सदर प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा 18 ते 35 असून आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड जात प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो बँक पासबुक झेरॉक्स आवश्यक आहेत त्यासाठी आपल्याकडे रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागेल. याकरिता पंचायत समिती कनिष्ठ लिपिक नितीन कोयंडे यांच्याशी संपर्क करावा.अधिक माहितीसाठी
9404441832 या नंबरवर संपर्क साधावा. परिपूर्ण अर्ज भरून झाल्यावर मुलाखतीद्वारे आपली निवड केली जाईल. सदर तारीख मागाहून कळवली जाईल याची नोंद घ्यावी. यामध्ये जास्तीत जास्त युवक-युवतीने व बचतगट महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांनी केले आहे.