वेंगुर्ले
तालुक्यातील परुळेबाजार येथील काथ्या प्रक्रिया उद्योग केंद्राचे उद्घाटन रविवार 31 ऑक्टोबर रोजी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अन्य मान्यवर ही उपस्थित राहणार आहेत.
चांदा ते बांदा योजनेंतर्गत महाराष्ट्र लघुउदयोग विकास महामंडळाच्या मार्फत ग्रामपंचायत परुळेबाजार कार्यक्षेत्रात श्री येसूआका महिला काथ्याप्रक्रिया उद्योग व सामूहिक सुविधा केंद्राचे उभरण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन 31 रोजी सायंकाळी 5 .30 वाजता आमदार केसरकर यांच्या हस्ते होणार आहे, तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असेआवाहन करण्यात आले आहे.