You are currently viewing किरातच्या महिलांसाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

किरातच्या महिलांसाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

सरिता पवार यांच्या ‘माफी’ कथेला प्रथम क्रमांक

पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी वेंगुर्ला येथे किरात दिवाळी अंकासाठी महिलांसाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. या कथा स्पर्धेत कवयित्री, कथालेखिका सरिता पवार यांच्या ‘माफी’ या कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. सरिता पवार यांनी आपल्या माफी या कथेत गोठ्यातील बैल आणि लहान मुलगी यांच्यातील भावनिक नाते शब्दबद्ध केले आहे. मुक्या प्राण्यांना लागलेला लळा या कथेतून वाचकांना भावतो.

किरातने आयोजित केलेल्या स्पर्धेचे हे सलग दुसरे वर्ष असून यावर्षीही स्पर्धकांचा उदंड प्रतिसा मिळाला. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिक अजित राऊळ व वीरधवल परब, वेंगुर्ला यांनी केले आहे. यात प्रथम क्रमांक सरिता पवार, कणकवली, द्वितीय क्रमांक प्राजक्ता आपटे, वेंगुर्ला, तृतीय क्रमांक अमृता दळवी, कणकवली, चतुर्थ क्रमांक मृणालिनी देसाई, धामापूर, पाचवा क्रमांक मधुरा तिळवे, सांगली (वेंगुर्ला) ; सहावा क्रमांक वैशाली मठकर डोंबिवली (वेंगुर्ला) यांना प्राप्त झाला आहे. या १ ते ६ क्रमांक प्राप्त कथांचा समावेश किरात दिवाळी अंकात केला असून या सर्वांना रोख रकमेसहीत अरुण सावळेकर लिखीत ‘नाट्यरंग’ या दीर्घांकीकेची प्रत भेट म्हणून दिवाळी अंकासोबत दिली जाणार आहे. सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे किरात परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा