You are currently viewing आजीचा पदर

आजीचा पदर

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी दीपक पटेकर यांची काव्यरचना

खरंच दुर्मिळ झाला
आता आजीचा पदर
एकत्र कुटुंबावर होती
तिच्या मायेची चादर

आजी असते घरात
जणू दुधावरची साय
डोईवरी हात ठेवतसे
जशी जन्मदाती माय

रडू येता नातरांना जरा
पदर आजीचा पुसे डोळे
ओवाळून टाकतसे माती
समज असती देवभोळे

मांडीवर झोपवूनी आजी
चिऊकाऊच्या सांगी गप्पा
नातरांनाही आठवत नसे
झोपताना मम्मी न पप्पा

मी आणि माझा संसार
ही संकल्पना जन्मली
पोरका झाला तो पदर
नातवंडे आजीस मुकली

©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग ८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा