शिवसेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
वेंगुर्ला
जिल्ह्यातील समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ होत आहे. समुद्रात पोहायला गेलेल्या पर्यटकांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने दुर्घटना होताना दिसत आहे. अश्या दुर्घटना थांबाव्यात यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर सारख्या मोठ्या वर्दळीच्या समुद्र किनारी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न व्हावेत यासाठी सिंधुदुर्ग युवासेना उपजिल्हाधिकारी सागर सोमकांत नाणोसकर यांनी खासदार विनायक राऊत यांचे निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.
यावेळी माजी आमदार शंकर भाई कांबळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवासेना जिल्हाधिकारी मंदार शिरसाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील दुबळे, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.