सिंधुदुर्ग जिल्हयातील विविध विकासकामांवर केली चर्चा
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांची जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक आणि शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर सदिच्छा भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांवर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडु देणार नाही अशी ग्वाही आमदार वैभव नाईक आणि युवानेते संदेश पारकर यांना दिली.
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुबलक प्रमाणात लस, अंबुलन्स आणि कोविड निधी उपलब्ध दिल्याबाबत श्री.नाईक आणि श्री.पारकर यांनी मुख्यमंत्री महोदयांचे विशेष आभार मानले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी विशेष दौरा करण्याची मागणी देखील केली केली.